Friday, June 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोटाळा? तब्बल 1.25 कोटी महिलांना डच्चू; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर घणाघात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 1 June 2026, 20:59

मुंबई: राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारकडे पारदर्शक स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, योजनेच्या सुरुवातीला राज्य सरकारने 2.37 कोटी महिलांना लाभ दिल्याचा दावा केला होता. डिसेंबर 2024 पर्यंत या महिलांना 17 हजार 505 कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली होती. पुढे लाभार्थ्यांची संख्या 2.46 ते 2.48 कोटींपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र, ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक झाल्यानंतर लाभार्थींची संख्या कमी होत गेली. सध्या सुमारे 1.66 कोटी महिलांनाच योजनेचा लाभ मिळत असल्याचे समोर येत असून, तब्बल 80 लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती माध्यमांतून समोर येत असल्याचे सुळे यांनी नमूद केले.

 

याशिवाय, योजनेच्या पोर्टलवरील आकडेवारीनुसार एकूण अर्जांची संख्या 1.12 कोटी आणि मंजूर अर्जांची संख्या 1.06 कोटी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीच्या तुलनेत 1.25 कोटींहून अधिक महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सरकारने सुरुवातीला जाहीर केलेले लाभार्थी कोण होते, पडताळणीत इतक्या मोठ्या प्रमाणात महिला अपात्र का ठरल्या आणि सध्याची नेमकी लाभार्थी संख्या किती आहे, याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, आर्थिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण करण्यात यावे, तसेच कोणतीही पात्र महिला केवळ तांत्रिक कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा; सरकारने एलपीजी पुरवठ्यावरील निर्बंध हटवले

Thursday, 25 June 2026, 22:58

उसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

Thursday, 25 June 2026, 22:34

चिमुकल्याच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठांवर मारहाणीच्या खुणा; अंगावर ठिकठिकाणी चावल्याच्या जखमा; प्री स्कुलमध्ये चिमुकल्यासोबत काय घडलं?

Thursday, 25 June 2026, 22:10

हातात झाडू, मनात शिस्त, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा आदर्श उपक्रम

Thursday, 25 June 2026, 21:34

पोलीस ठाण्यातच पोलीस शिपायाला किस करणं पडलं महागात! तात्काळ निलंबनाचे आदेश; व्हायरल व्हिडीओने खळबळ..

Thursday, 25 June 2026, 21:27

मोठी बातमी! सिया गोयलच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका; तातडीने रुग्णालयात दाखल

Thursday, 25 June 2026, 20:38
Next Post

अनधिकृत ढाबे, पार्किंग हटवून रस्ते मोकळे होणार; अपघात रोखण्यासाठी मोहीम, रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय‎

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.