जीवन सोनावणे
Big News : खंडाळा : राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी व जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राजकीय सभा, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचा एकमुखी निर्णय अतीट ग्रामस्थांनी घेतला आहे.
खंडाळा तहसीलदारांना निवेदन
खंडाळा तालुक्यातील अतीट येथील ग्रामस्थांनी निर्णय घेत खंडाळा बस स्थानक ते तहसील कार्यालय याठिकाणी पायी मोर्चाचे आयोजन केले होते. (Big News) आंदोलना दरम्यान मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, एकच मिशन मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं… अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या वेळी मराठा पुरुष व महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खंडाळा पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अतीट गावातील तरुणांनी याप्रश्नी सामूहिक निर्णय घेऊन, सकल मराठा समाज, अतीट सर्व युवा वर्ग तसेच माता-भगिनींनी गावामध्ये एकमताने ठराव मंजूर केली की, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राजकीय सभा, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही. गावामध्ये यापुढे होणाऱ्या सर्व प्रकारच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. (Big News) जालना येथील आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे.
दरम्यान, याबाबतचे निवेदन आज खंडाळा तहसीलदार कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने युवा वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : मराठवाड्याच्या विकासासाठी ४५ हजार कोटींचा निधी जाहीर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Big News : मुंबई विमानतळावर विमान क्रॅश ; तीन जण जखमी; विमानांचे टेक ऑफ, लँडिंग बंद