Big Breaking : नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली असल्याची चर्चा या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात होत आहे. (Sharad Pawar’s big announcement! Supriya Sule, Praful Patel NCP’s new working president)
सुप्रिया सुळे यांच्याकडे पंजाब, हरियाणा महाराष्ट्राची जबाबदारी
या नव्या जबाबदारी सह सुप्रिया सुळे यांच्याकडे पंजाब, हरियाणा महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे, तर पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, झारखंड,(Big Breaking ) राजस्थानची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणासर यावरून चर्चा रंगली होती. (Big Breaking ) कार्यकर्ते, नेत्यांच्या आग्रहानंतर पवार यांनी हा निर्णय बदलला होता. परंतू, आज त्यांनी एकप्रकारे आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली आहे.
शरद पवारांनी चेंबूर येथील सभेत पवारांनी भाकरी फिरवण्याची वेळ आलीय जर ती वेळीच फिरवली नाही तर करपू शकते असं म्हणत एक इशारा दिला होता. (Big Breaking ) त्यानंतर आज वर्धापन दिनाच्या दिवशी पवारांनी ही भाकरी फिरवली असल्याचे बोलले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking : शरद पवारांनंतर संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी