Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : हे काय! रागातून मित्राची गाडी पेटविण्यास गेला अन् अख्खे पार्किंग पेटले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 June 2023, 13:36

Pune News : पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द भागात एका सोसायटीत वाहने पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली. वडगाव खुर्द भागातील मियामी सोसायटीत मध्यरात्री शिरलेल्या अज्ञातांनी दुचाकी आणि मोटारीवर ज्वलनशील पदार्थ ओतला. दुचाकी आणि मोटारी पेटवून आरोपी पसार झाले.
मित्रांसोबत भांडण झाल्याने त्याच्यावरचा राग काढण्यासाठी गाडी पेटवायला गेला आणि भलत्याच गाड्या पेटवून त्या भस्मसात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एक चारचाकी आणि अन्य दुचाकी वाहनांचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. वडगाव-खुर्द येथील लगडमळ्यात असलेल्या मियामी सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. (Pune: What is this! Out of anger, he went to set his friend’s car on fire and the entire parking lot was set on fire)

याबाबत महेंद्र प्रदीप भिरुड (वय ४०, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती रहिवाशांनी पोलीस, तसेच अग्निशमन दलाला दिली. (Pune News) अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी गाड्या पेटवणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव खुर्द भागातील मियामी सोसायटीमधील ए-२ या इमारतीमधील लिफ्ट जवळ सोसायटीचे सार्वजनिक पार्किंग आहे. त्याठिकाणी रात्री येथील सर्व गाड्या उभ्या केलेल्या असतात. याच सोसायटीमधील एका मुलाचे आणि गाड्या पेटवणाऱ्या अल्पवयीन मुलाचे किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. भांडणाचा राग आल्याने मित्राचा बदला घेऊन धडा शिकवण्यासाठी त्याने मित्राच्या गाडीला आग लावण्याचे ठरवले.(Pune News)  मित्राची गाडी रात्रीच्या वेळी कोणत्या ठिकाणी लावली जाते याची त्याने पाहणी केली. त्यावेळी त्याला तेथील पार्किंगमध्ये गाडी लावल्याचे समजले. गुरुवार, ८ जून रोजी पहाटे १ वाजून २८ मिनिटांनी तो सोसायटीमध्ये आला. येताना सोबत त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीतून ज्वलनशील पदार्थ आणला होता. ते पदार्थ वाहनांवर टाकून काडीपेटीने आग लावली. गाड्यांना आग लावून तो पसार झाला.

चार वाहने जळून खाक

या आगीत वाहने जळून खाक झाली आहेत. त्यामध्ये २ मोपेड दुचाकी, एक एन्फिल्ड बुलेट आणि एक चारचाकी ही वाहने होती. (Pune News) सोसायटीमधील महेंद्र भिरुड यांनी हा प्रकार कोणी केला हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यांना एक अनोळखी मुलगा आढळला. या आगीत एकूण २ लाख ५० हजारांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : कोकण मराठी साहित्यधारा कवीकट्ट्याच्या कार्याध्यक्षपदी मंचरचे ज्येष्ठ साहित्यिक मोहमंद शकील जाफरी

Pune News : पत्नीची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे केली सोशल मीडियावर व्हायरल

Pune News : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून सासवड -जेजुरी पालखी मार्गाची पाहणी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऑनलाइन फसवणुकीच्या पैशांवरून अपहरण अन् मारहाण; आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Tuesday, 27 October 2026, 17:16

दुष्काळाचे संकट! पुणे जिल्ह्यातील 15 हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे; ‘महाडीबीटी’वर नोंदणी कशी कराल?

Tuesday, 27 October 2026, 17:10

शिरूरच्या बंधाऱ्यांसाठी घोड धरणातून ३५० दशलक्ष घनफूट पाणी सोडा – आमदार माऊली कटके

Tuesday, 27 October 2026, 17:09

सोरतापवाडीत ‘पार्सल आलेय’ म्हणत विवाहितेला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न; अश्लील फोटो पाठवून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी

Tuesday, 27 October 2026, 17:06

अभिषेकचं वादळी शतक! वैभवसोबत अवघ्या 23 मिनिटांत इतिहास घडवला; भारताच्या नावावर फास्टेस्ट 100चा विश्वविक्रम!

Tuesday, 27 October 2026, 16:39

पुण्यात मतमोजणीच्या सुरुवातीलाच वादाची ठिणगी! सील नसलेल्या 8 मतपेट्या सापडल्याचा आरोप; महाविकास आघाडी आक्रमक!

Tuesday, 27 October 2026, 16:27
Next Post

Big Breaking : शरद पवारांची मोठी घोषणा! सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp