Big Breaking : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी करत थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवारांनी घेतलेली विरोधी भूमिका ही राजकीय गुगली नसून, हा तर थेट दरोडा आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
अजित पवारांनी घेतलेली विरोधी भूमिका ही राजकीय गुगली नसून, हा थेट दरोडा
शरद पवार म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. (Big Breaking) पण आज त्यांनी मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही सदस्यांना शपथ दिली आहे. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप सत्य नव्हते हे सिद्ध केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, अशी गुगली शरद पवार यांनी टाकली.
भूमिका स्पष्ट करताना शरद पवार म्हणाले, पक्षातील नेत्यांनी माझ्या विरोधी भूमिका घेतली आहे. हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही. पुढील काळात घराबाहेर पडून शक्य तितक्या जास्त लोकांची भेट घेणार आहे. येत्या काही दिसांत मी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये काही प्रश्नांचा विचार करणार होतो. (Big Breaking) पण त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी आम्हीच पक्ष आहोत, अशी भूमिका मांडली. पक्षातील विशेषतः विधीमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली, याचं चित्र पुढील दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल.
शरद पवार म्हणाले की, ज्या नेत्यांची नावे आली आहेत, त्यापैकी काहींनी आजच मला संपर्क साधून आम्हाला याठिकाणी निमंत्रित केलं आणि सह्या घेतल्या आहेत, पण आमची भूमिका वेगळी आहे, (Big Breaking) असा खुलासा केलेला आहे. याबाबत मी आताच काही बोलू इच्छित नाही. कारण हे स्पष्ट चित्र जनतेसमोरही मांडण्याची आवश्यकता आहे. अन्यथा त्यांनी विरोधी भूमिका घेतली, असा निष्कर्ष मी काढेन. हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही.
शरद पवार यांनी १९८० सालच्या निवडणुकीची आठवण सांगितली. या निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो, त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. त्यापैकी ५ वगळता सगळे माझा पक्ष सोडून गेले होते.(Big Breaking) फक्त ५ जणांना घेऊन मी पक्ष वाढवण्यासाठी बाहेर पडलो. पुढच्या निवडणुकीत आमची संख्या ६९ वर गेली.पक्ष सोडून गेलेल्यांपैकी ३ ते ४ जण सोडले तर सगळे पराभूत झाले. (Big Breaking) तेच चित्र महाराष्ट्रात आता निर्माण झालं आहे. आता हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर कसं मांडता येईल, याचा प्रयत्न मी करणार आहे. २०१९ च्या निवडणुकीतही असंच चित्र होतं. पण महाराष्ट्रात जाऊन आम्ही आमची भूमिका मांडली. परिणामी आमची संख्या वाढली आणि संयुक्त सरकारही आम्ही स्थापन केलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking : वरंध घाट अवजड वाहनांसाठी ३ महिने बंद
Big Breaking ! पुणे महापालिकेतील एकास १ लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले; एसीबीची कारवाई…