Big Breaking मुंबई : मानहानी प्रकरणातील शिक्षेविरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी आज सुरतच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या खटल्यात राहुल गांधी यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.
सुरतच्या कोर्टात आव्हान याचिका दाखल…!
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये प्रचारादरम्यान सगळे मोदी आडनावाचे लोक चोर असतात असं वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी त्यांना सुरतच्या कोर्टाने दोन वर्षांची सुनावली होती. तर आज राहुल गांधी हे बहीण प्रियंकासह आणि तमाम काँग्रेस नेते सुरतमध्ये पोहचले होते. सुरतच्या कोर्टात जी आव्हान याचिका राहुल गांधी यांनी दाखल केली होती त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सुरत कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर ३० दिवसांची मुदत दिली होती. त्या तीस दिवसांच्या आत राहुल गांधी यांनी कोर्टात अपील करणं आवश्यक होतं. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. त्या सुनावणीत जर राहुल गांधी यांची शिक्षा रद्द करण्यात आली तरच त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल. आता याबाबत नेमकं काय होईल ते १३ एप्रिलला समजू शकणार आहे. राहुल गांधी यांना फक्त जामीन मंजूर होऊन त्यांचं निलंबन मागे घेतलं जाणार नाही. मात्र दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय झाला तरच खासदारकी रद्द होण्याची जी कारवाई होती त्यावर विचार होईल.