Big Breaking : मुंबई : भाजपशी फारकत घेत शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी, एकनाथ शिंदे यांनी भाजपशी केलेली हातमिळवणी, त्यानंतर अजित पवारांनी बंड करून सत्तेत सहभागी होणे, या सर्व घटना घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. ही बॅनरबाजी सुरू असतानाच मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती नुकतीच मिळाली आहे. राजकीय वर्तुळातील मोठी बातमी आहे.
ठाकरे बंधुंनी एकत्र यावे म्हणून मुंबईत बॅनरबाजी
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला गेल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्ती नेते अभिजीत पानसे यांनी आज दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. (Big Breaking ) यावेळी त्यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे.
अजित पवार यांनी बंडखोरी करत सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केली. यामुळेच मनसेने हा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना दिल्याची चर्चा होत आहे. (Big Breaking ) मनसेचा प्रस्ताव मान्य झाल्यास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असून, राज्यात नव्याने राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दरम्यान, अभिजीत पानसे यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. पानसे म्हणाले की, संजय राऊत आणि माझे जुने संबंध आहेत. (Big Breaking ) माझ्या काही वैयक्तिक कामासाठी मला त्यांची भेट घ्यायची होती. याबाबत विचारणा केली असता, ते घरी नसून सामनामध्ये असल्याचे मला समजले, म्हणून मी सामना कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking : मोठी बातमी! अजित पवार गटाला ४४ आमदारांचा पाठिंबा… पुतण्याचा काकांना दे धक्का!