Big Breaking पुणे : अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत किंवा त्यासोबत जाणार आहेत अशा चर्चांनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. अजित पवारांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील स्पष्टीकरण दिले होते. मात्र त्यानंतरही अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या . त्यावर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला.
पवार म्हणाले…!
नागपूर येथील सभेला मी ठाकरे यांच्या विमानात आलो. त्यानंतर मी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये श्री सेवकांना त्रास झाला. त्यामुळं आम्ही तेथून थेट सेवकांची भेट देण्यासाठी गेलो. असे त्यांनी सांगितले. राज्यात एव्हढे मोठे संकट आले होते , त्यावेळी त्यांनां आधार दिला पाहिजे. सरकार कुठे तरी कमी पडले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संध्याकाळी ही घेता आला असता. जखमी सेवकांना भेटलो. यावर आम्ही राजकारण करणार नाही.
१४ कोटी खर्च केले मग मंडप का टाकला नाही. माणसांच्या जीवाशी का खेळता. असा संताप त्यांनी व्यक्त केला. उन्हाळा होता, तर पावसाळ्यात किंवा राजभवन ला कार्यक्रम घेयला होता.
निष्काळजीपणा नडला. त्यामूळे सरकारचे हे अपयश आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला. मृत सेवकांच्या परिवाराला वाढीव मदत द्यावी, अशी मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारला यातून काही राजकारण साधायचे होते का ?? कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम राज्य सरकारने केले. असे तर म्हणाले.
आमदारांच्या ४० सह्या घेतल्या याला आधार नाही….
बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. त्यात काही तथ्य नाही. आम्ही सर्वजण राष्ट्रवादीच आहोत. आमदारांची वेगवेगळी कामे होती त्यामुळे ते भेटायला आले होते. आमदार भेटल्याची चर्चा केली जात आहे. ती चुकीची आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काम करत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी अशी चर्चा घडवली जात आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचा मोठा प्रश्पत्रिकेत आहे. मुख्यमंत्र्यांनी दौरे केले पण, मदत जाहिर केली जात नाही.
यावर बोलले अजित पवार….
– माझ्यामागे कॅमेरे लावले जात आहेत.
– आपण सभ्यता पाळली पाहिजे.
प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडिया विनं ती आहे. की कोणीही काही चुकच्या बातम्या देऊ नयेत.
– वज्रमुठ सभेत कोण बोलणार हे महविकास आघाडीने ठरवले आहे.
त्यामुळे कोण बोलले नाही, त्यावर विनाकारण चर्चा करू नये.
– माझ्या ट्विट मद्ये
उपमुख्यमंत्री पद गेल्यावर ती माहिती काढली. ध चा मा करू नका….. काही असेल तर सांगेल ना, कोठून तरी बातम्या काढू नका. कोणी बातम्या पेरत असेल तर पाहावे लागेल. मी राष्ट्रवादीत आहे तर आता प्रतिज्ञा पत्रावर लिहून देऊ का? असे त्यांनी सांगीतले.
आता या गोष्टी थांबावा.
कोणीही गैरसमज करून घेऊ नका. कोणती ४० ते ५० सह्या घेतलेल्या नाहीत. आमची सहनशीलता संपू शकते. त्यामुळे कोणीही शहनशिलेतेचा अंत करु नका. कोणा एकाची ही सही घेतली नाही.असे त्यांनी अखेर स्पष्ट केले आहे. अजित पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे राजकीय चर्चांमध्ये काहीही सत्य नसल्याचे आता उघड झाले आहे.