Big Breaking : मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शिवसेना-भाजपशी हातमिळवणी केली. अजित पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ तर इतर ८ जणांना मंत्री पदाची लॉटरी लागली. या सर्व घटना-घडामोडींनंतर एक मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार यांच्यासोबत काल ज्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, ते मंत्री शरद पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शरद पवार यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू
राष्ट्रवादीमध्ये काल झालेल्या भूकंपानंतर आज शरद पवार यांनी पक्षाची पुन्हा नव्या जोमाने उभारणी करण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पुन्हा नव्याने सुरूवात करू… अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी बंडाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली होती. आज शरद पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. (Big Breaking) शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी कराडला रवाना झाले आहेत. या वेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांचं साताऱ्यात भव्य स्वागत केलं. शशिकांत शिंदे यांच्यासोबत जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि मकरंद पाटील हे देखील शरद पवार यांच्या गाडीमध्ये दिसून आले.
अजित पवार यांच्यासह ८ मंत्र्यांनी काल मंत्रीपदाची शपथ घेतली. (Big Breaking) या शपथविधीला राष्ट्रवादीचे अनेक आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. या शपथविधीला राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित असल्याचे दिसले होते. मात्र, आज हे तीनही आमदार शरद पवार यांच्यासोबत दिसून येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, अजित पवारांसोबत शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले काही मंत्री शरद पवार यांनी वेळ दिल्यास त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. (Big Breaking) आता यावर शरद पवार काय निर्णय घेणार, हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.