मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत भाजपचे पाच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही 2 उमेदवार विजयी झाले आहेत. एका जागेचा निकाल येण्याचे बाकी आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फोडण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे अजित पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे मत फोडण्यास अपयशी
काँग्रेसच्या उमेदवार आणि राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे. मात्र, निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली आहेत. काँग्रेसची एकूण 8 मतं फुटली आहेत. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा पाहायला मिळत आहे. शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही.
उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं एकही मत आपल्याकडे वळवता आलं नाही. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाची मते फुटणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र अजित पवारांची मतं फोडण्यात अपयश आल्याचे विधान परिषद निवडणुकीवरून सिद्ध झालं आहे. दुसरीकडे काँग्रेसची मतं फुटल्याने एक प्रकारे महाविकास आघाडीलाच या निवडणुकीमध्ये धक्का बसल्याच बोललं जात आहे.
कोणते उमेदवार विजयी?
भाजपचे विजयी उमदेवार
1) योगेश टिळेकर – 26 मते
2) पंकजा मुंडे – 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे – 26 मते
5) सदाभाऊ खोत – 24
एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
1) भावना गवळी – 24
2) कृपाल तुमाने- 25
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
1. शिवाजीराव गर्जे – 24
2. राजेश विटेकर – 23
काँग्रेस विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव – 26
शिवसेना ठाकरे गट
1) मिलिंद नार्वेकर – 24