भोर / तुषार सणस : राष्ट्रीय गुरव समाज महासंघाची भोर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये भोर तालुका अध्यक्षपदी किरण भदे यांची तर कार्याध्यक्षपदी सोमेश भगवान यांची निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय कार्यकारिणीवर कापुरव्होळ येथील महेश दळवी यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचा पुणे जिल्हा मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे व कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत वारजे पुणे येथे पार पडला. यावेळी पुणे जिल्हा समन्वयक गणेश पावशेरे व पुणे जिल्हाध्यक्ष किसनराव शिवणखेडे यांनी पुणे जिल्हातील सर्व तालुक्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
महासंघाच्या भोर तालुका अध्यक्षपदी नसरापूर येथील किरण भदे यांची तर कार्याध्यक्षपदी कोंढणपुर येथील सोमेश भगवान, उपकार्याध्यक्षपदी वेळु येथील बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्षपदी भोर येथील ऍड. मंगेश आंबुले व उंबरे येथील नामदेव देवकर, कोषाध्यक्षपदी हातवे येथील मंगेश राजगुरु, सहकोषाध्यक्षपदी भांबवडे येथील तिमिर गुरव, सचिवपदी विजय कुलकर्णी, सहसचिवपदी देगाव येथील ऍड. रामदास गुरव व आंबवडे येथील सागर पुजारी यांची निवड करण्यात आली.
दरम्यान, युवा तालुकाध्यक्षपदी मोहरी येथील किरण राजगुरु यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये भोर तालुक्यातून महेश उर्फ लखन दळवी यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या हस्ते मेळाव्यामध्ये सर्वांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
यावेळी विजयराज शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाने संत काशिबा महाराज गुरव समाज विकास महामंडळ स्थापन करत गुरव समाजाला आर्थिक शैक्षणिक व सामाजिक प्रगती करण्याची चांगली संधी दिली आहे. नवनियुक्त तालुका कार्यकारिणीने समाजामधील आर्थिक दुर्बल व गरजू बांधवांनी प्रगती करावी. तसेच शिक्षणासाठी देखील मिळणाऱ्या मदतीचा फायदा घेऊन मुलांना उच्च शिक्षण द्यावे, असे आवाहन केले.
दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष किरण भदे यांनी भोर तालुक्यातील सर्व गुरव बांधवांची माहिती संकलित करुन गरजू कुटुंबांना या महामंडळाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.