पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सेनेमार्फत ठिकठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे, ‘उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा घाटा’ असे फ्लेक्स लावले आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. महाराष्ट्रामधून किती प्रकल्प कधी आणि कुठे गेले आहेत. त्या नावाची यादी प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.हे फ्लेक्स शहरातील नागरिकाचे लक्ष्य वेधून घेत आहेत.
महाराष्ट्रातील पाच प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. महाराष्ट्रातील वेदांत फॉक्सोन,बल्क ड्रग पार्क ,टाटा एयर बस सह अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यात गेल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राचे केलेले नुकसान या आशयाचा बॅनर डोंबिवली पश्चिम परिसरात बाळासाहेबांची युवा सेनेने झळकावले आहेत…. या बॅनरच्या माध्यमातून थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यात आला आहे..
यात रविवारी लालबाग परिसरात शिंदे गट व भाजपच्या विरोधात मुंबईसह महाराष्ट्रातील तरुणाई विचारतेय यासाठीच हवा आहे का? बदल असा सवाल करत उद्धव बाळासाहेब ठाकरे विद्यार्थी सेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत बाळासाहेबांची युवा सेना तर्फे ठाकरे सरकार विरोधात बॅनरबाजी करण्यात आलीये.. उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा घाटा ..असे यावर लिहिण्यात आले आहे.