मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्याचे आज मंगळवारी (ता.२) दिल्लीत आयोजन रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे आज दुपारी ४ वाजता पार पडणार आहे. या सोहळ्याचे उदघाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. जे पी .नडडा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित राहणार आहेत. तर रिपब्लिकन पक्षाने आयोजित केलेल्या स्वतंत्रच्या सुवर्ण महोसव अर्थात आझादी का अमृत महोसव हा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून देशभरातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत.
भारतीय स्वातंत्र्याचा यंदा ७५ वा वर्धापन दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर आणि जगभर आझादीका अमृत महोत्सव साजरा होत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढयात स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या योगदानाचा कृतज्ञ गौरव ; स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतींना उजाळा देत देशप्रेम जागणविण्याची द्विगुणीत करण्याचा महोत्सव म्हणजे आझादी का अमृत महोत्सव आहे.
दरम्यान,आझादी का अमृत महोत्सवच्या माध्यमातुन भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या शूर, महान स्वतंत्र्यवीरांचा गौरव आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचा गौरव आझादीका अमृत महोत्सव या कार्यक्रमातून करण्यात येत आहे.
रिपब्लिकन पक्षातर्फे आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.