(Amruta Fadnavis) मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना कोट्यावधींची लाच ऑफर करण्यात आली होती. हे प्रकरण उपडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
वडील कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला पोलिसांनी गुजरात मधून केली अटक…!
या प्रकरणातील आरोपी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी हीला अटक केल्यानंतर तिचे वडील कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला पोलिसांनी गुजरात मधून अटक केली आहे. त्यानंतर या प्रकरणातील घडमोडींलाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबई क्राईम ब्रांचने गुजरातच्या कलोलमधून जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या नंतर त्याची चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखीन एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. स्वतः अमृता फडणवीस यांनी याबद्दल मलबारहिल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अनिक्षा जयसिंघानी हिने अमृता यांना बंद पाकिटातून बुकींची नावं आणि नंबर दिले होते. या बुकींना कारवाईची धमकी दिल्यास दोघांनाही आर्थिक फायदा होईल असे अनिक्षाने सांगितले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!