Amravati News : अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी मंगळवारी (ता. १३ जून) अमरावती ते वलगाव असा दहा किलोमीटरचा प्रवास एसटी बसने पूर्ण केला. दुपारी बारा वाजता त्यांनी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांना चिखलदरा येथे जायचे असल्यामुळे त्या वलगावपर्यंत एसटी बसद्वारे प्रवास करत गेल्या. सोमवारी मेळघाटात एसटी बस दरीत कोसळली होती; या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. या बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर खासदार राणा यांनी या मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बसमधील प्रवाशांची संवाद साधला. (Navneet Rana traveled from Amravati to Valgaon by ST bus; Seeing the bad situation, she said…)
आदिवासी भागात नादुरुस्त बस पाठवत असल्याचा आरोप
या पाहणीवेळी राणा यांच्या निदर्शनास आले की, रिजेक्ट झालेल्या एसटी बस अमरावती जिल्ह्यासाठी पाठवल्या जातात. ग्रामीण भागात आणि आदिवासी भागासाठी नादुरूस्त बस पाठवतात,असा आरोप या वेळई राणा यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या समस्येची दखल घ्यावी, अशी मागणी राणा यांनी केली.
या प्रवासादरम्यान खासदार राणा वाहकाच्या सीटवर बसल्या.(Amravati News) बसमधील प्रवाशांशी देखील त्यांनी या वेळी मनमोकळा संवाद साधला. वलगावला उतरल्यावर माध्यमांशी संवाद साधताना राणा म्हणाल्या की, शासन आता इलेक्ट्रिक एसटी बस आणणार आहे. अमरावतीत मात्र इलेक्ट्रिक एसटी बसऐवजी चांगल्या दर्जाच्या गाड्या द्याव्यात, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.
चिखलदरा येथे स्कायवॉकच्या पाहणीसह विविध कार्यक्रमांना त्या हजर राहणार आहेत. (Amravati News) अमरावती बसस्थानक येथून वलगावपर्यंत १० किलोमीटरचा प्रवास त्यांनी एसटी बसने केला. वलगावला त्या एसटी बसमधून उतरल्या आणि पुढे परतवाडा आणि चिखलदरापर्यंतच्या प्रवासाला त्या आपल्या खासगी वाहनाने गेल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Railway News : हडपसर टर्मिनलचे होणार लवकरच विस्तारीकरण ; पुणे रेल्वे स्टेशनवरील भार होणार कमी..!