लोणी काळभोर : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विनोद गणपत जवळकर यांची तर उपाध्यक्षपदी जालिंदर अनंता शिवरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष संदिप पवार आणि उपाध्यक्ष बाळासाहेब शिवरकर यांचा कार्यकाल संपल्यानंतर सदर पद रिक्त झाले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील सत्यशोधक दिनकरराव जवळकर सभा मंडपात आज बुधवारी (ता.२) पार पडली. हि निवडणूक प्रक्रिया सरपंच सोनाली जवळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी विनोद जवळकर यांची तर उपाध्यक्षपदी जालिंदर शिवरकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान, अध्यक्षपदी विनोद जवळकर यांची तर उपाध्यक्षपदी जालिंदर शिवरकर यांची निवड झाल्यानंतर दोघांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी गुलालाची उधळून आनंद व्यक्त केला.
यावेळी जेष्ठ नेते भगवान जवळकर , माजी सरपंच अशोक जवळकर, आबासाहेब जवळकर, उपसरपंच मनिषा भोंडवे, माजी उपसरपंच तेजस शिवरकर, ग्रामविकास अधिकारी पी.एस.पवार, गावकामगार तलाठी योगीराज कणीचे, लक्ष्मण भोंडवे, दिनकर भोंडवे, माऊली जवळकर, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिवरकर, सोमनाथ जवळकर, शंकर जवळकर, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद जवळकर म्हणाले, “मुळात गावात तंटेच होत नाही आणि झालेच तर सर्वांना बरोबर घेऊन समजुतीनेच त्याच्यावर तोडगा काढला जाईल. व गावामध्ये जास्तीत जास्त झाडे लावून ती कशी जगवता येतील. यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सर्वाचे आभार..”