Ajit Pawar मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी महाविकास आघाडीची सभा पार पडली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी चांगलीच फटके बाजी केली.
विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
असे असताना सभेतील एका गोष्टीवरून प्रश्न पडला आहे.
महाविकास आघाडीच्य वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंसाठी वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. यामुळे राज्याच्या राजकारणात भलतीच चर्चा रंगली होती, माध्यमांनी देखील याबाबत बातम्या चालवल्या. पण आता या चर्चेवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार म्हणाले…!
“महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेला सर्वजण उपस्थित असतील असं नाही, सभेसाठी तसं धोरणं स्विकारण्यात आलं आहे. त्यानुसार दोन तासात सभा संपावी यासाठी प्रत्येक पक्षाचे साधारण दोनच नेते बोलतील, असंही यात ठरलंय. आमच्या प्रत्येक पक्षात अनेक मान्यवर आणि वडीलधारे आहेत. काल बाळासाहेब थोरात यांनी सभा उरकली आणि आज स्वतः राहुल गांधी सूरतला येणार होते म्हणून ते लगेच निघाले, त्यामुळं त्यांच्या जाण्याला वेगळं वळण देण्याची गरज नाही.
दरम्यान, गेल्या काळात उद्धव ठाकरेंना पाठीचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळं आजही ते ताठ बसता येईल अशी खुर्ची वापरतात. त्यामुळं सभेच्या ठिकाणी देखील अशीच खुर्ची ठेवण्यात आली होती. बाजूला दोघांसाठी सोफ्याच्या खुर्च्या ठेवल्या होत्या, त्यामुळं यामध्ये खुर्चीबाबत भेदभाव केलेला नाही, याची नोंद घेण्यात यावी, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी या वादावर दिलं आहे.