Ajit Pawar पुणे : खारगाव येथे झालेली दुर्घटनेची वस्तूस्थिती समोर यायला हवी. तेथील आकड्यात तफावत आहे. त्यामुळे आम्ही माहिती अधिकाराखाली त्या दुर्घटनेची माहिती मागविली आहे. या मध्ये स्पष्ट होईल अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit Pawar यांनी पुण्यात शुक्रवारी सांगितले.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचा सर्वाधिक खर्च या वेळी झाला, या प्रकरणाविषयी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे पवार म्हणाले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
यापुढे बोलताना पवार म्हणाले…!
खारगाव येथील घटनेची क्लिप पाहिली तर त्यात भयानक स्थिती दिसली. काही फोटोत एकीकडे चांदीचे ताटात जेवण सुरू आहे आणि दुसरीकडे लोकं गतप्राण होत आहेत, हा विरोधाभास आहे. यात नक्की कितीजण गेले त्याचा तपास व्हायला हवा.
सरकारने कार्यक्रम आयोजित केला होता. “सरकारची जबाबदारी होती. सरकार सांगते या म्हणून माणसं तिथे गेली. खरंतर दुपारची वेळ का निवडली. लोकांना वेळेवर सोयी का दिल्या नाहीत. मी असं ऐकलंय की, पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये असं आढळून आले की, त्या लोकांच्या पोटात ८ तास अन्नपाणी गेले नव्हते. हे सर्व गंभीर आहे. न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे.’’