(Ajit Pawar) पुणे : अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका असल्याची तक्रार भाजपाचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर अजित पवार यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागून राहिले होते. मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
पवार म्हणाले…!
‘मी छोटा कार्यकर्ता आहे. माझ्यापासून कुणाला धोका नाही. राजकीय धोका मात्र होऊ शकतो. मी कुणाला धमकी देत नाही. ज्याने तक्रार दिली आहे. त्याला स्टेन गन घेऊन संरक्षण द्यावे, असा टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.
तर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र या आरोपपत्रात अजित आणि सुनेत्रा पवारांचे नावच नसल्याने त्यांनी दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. मात्र, ईडीबाबत बातम्या आल्यात त्या चुकीच्या आहेत. चौकशी अजूनही सुरु आहे. त्यात काही दिलासा दिलाय असं म्हणायचं कारण नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले आहे.
शरद पवार आणि उध्दव ठाकरेंच्या भेटीविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी एकसंध आहे. आमच्यात कुठलाही वाद नाही. काही वक्तव्यावरुन मतमतांतरे निर्माण झाली होती. त्यावरुन आघाडीत वाद आहे असं वाटत होतं. मात्र,तसं काही नाही. नागपुरच्या सभेला मी जाणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले का असं माध्यमांमध्ये जातात हे मला अजून कळालं नाही. आमची बैठक होईल तेव्हा आम्ही चर्चा करु, असे त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. अवकाळी पावसासंदर्भात चर्चा करु. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.