नागपूर : आगामी अडीच वर्षात मला काय मिळणार यापेक्षा आपल्या जागा कशा जास्त निवडून येतील याकडे जास्त लक्ष द्या. अशा ठेवून बसल्यास कार्यक्षमता संपते, त्यामुळे माझ्या सरकारला मी यशस्वी करणार अशी भावना असणे आवश्यक आहे, असे विचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधीकारी व आमदारांची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार व पधाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.
गेल्या सरकारने आपले निर्णय स्थगित केले. तत्कालीन सरकारने कोरोना काळात कुणालाच मदत केली नाही. पण आपण शेतकऱ्यांना दुप्पट मदत केली. गेल्या पाच महिन्यात आपले सरकार धडाडीने काम करत आहोत. विरोधक आपली धडाडी मॅच करत नाहीत. त्यामुळेच ते केवळ विषय मोठे करून राजकारण करत असलयाच्याची टीका फडणवीस यांनी केली.
ज्यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागितले तेच आज घोषणा देत आहेत. आमच्यासाठी महापुरुष हे कालही आदर्श होते, आणि आज देखील आहेत, असे म्हणताना फडणवीस यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला.
महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईमध्ये घेण्यात आलेल्या मोर्च्यावर देखील फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला. सात पक्ष एकत्र येऊन सुद्धा १५ ते २० हजारांची ते गर्दी जमवू शकत नाहीत. म्हणूनच हा नॅनो मोर्चा होता.
मोर्चासाठी लोकांना पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ देखील केशव उपाध्ये यांनी ट्विट केला असून मोर्च्यात लोकांना आपण कशासाठी आलो आहोत हेच त्यांना माहिती नव्हते, अशी तुफान फटकेबाजी देखील फडणवीस यांनी केली.