औरंगाबाद : पैठण तालुक्यात शाळा, मेडिकल कॉलेज, रुग्णालय, साखर कारखाने, रस्ते होण्याची अपेक्षा होती. पण, मंत्री आणि पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर ९ दारूची दुकाने उघडली, असा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांना लगावला.
पैठण येथे शनिवारी (ता. ११) एका सभेला संबोधित करताना अजित पवार बोलत होते. पैठण तालुक्यात साखर कारखाने, आपेगाव विकास प्रतिष्ठान, एमआयडीसी, महाविद्यालय हे सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं आहे. भुमरेंनी काय दिलं? याचा लोकांनी विचार करायला हवा. असा सवालहि अजित पवार यांनी उपस्थित केला.
यापुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “दुकानासमोर गतिरोधक बसवलं. का तर गाडी थांबावी आणि गिऱ्हाइकाने थांबत टाकून जावं उलट लहान मुले-मुलींना त्रास होऊ नये म्हणून शाळा जवळ गतिरोधक बसवतो. मात्र, या पद्धतीने स्वत:ची दुकाने चालवण्यासाठी गतिरोधक बसवता. कुठे फेडाल हे पाप तळतळाट लागेल,” अशी मिश्कील टिप्पणी हि अजित पवारांनी केली.”
दरम्यान, एकदा शेतकऱ्यांचं पिक उद्ध्वस्त झालं, तर तीन वर्षे शेतकरी उमजत नाही. एक आमदार चुकीचा निवडला, तर पुढं तुमचं वाटोळं होतं,” असा खोचक टोलाहि पवारांनी भुमरेंना लगावला आहे.