दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप युती सरकारकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ महाराष्ट्र नगरोत्थान अभियान या योजनेतून रु.१० कोटींचा निधी दि.२४ फेब्रुवारी रोजी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज शुक्रवारी दिली.
सदर निधी मंजूर केलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.
इंदापूर तहसील कार्यालय ते इजगुडे पेट्रोल पंप रस्ता करणे ( १६३.५४ लाख ), दत्तनगर अंतर्गत ते कदम सभागृह ते बोरा हाईटस ते वडरगल्ली शौचालय पर्यंत अंडरग्राउंड ड्रेनेज करणे ( ११२.१३ लाख ), महात्मा फुले शॉपिंग सेंटर नॅशनल हायवे ते मंगेश पाटील हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटी रस्ता करणे ( १९९.९५ लाख ),
इंदापूर नगर परिषदेमध्ये योग भवन व लॅंडस्कॅपिंगचे बांधकाम (भाग अ) करणे ( १५२.८८ लाख ), इंदापूर नगर परिषदेमध्ये योग भवन व लॅंडस्कॅपिंगचे बांधकाम (भाग ब ) करणे ( ८०.३६ लाख ), नगरोत्थान अभियान योजनेतून इंदापूर शहरात विविध ठिकाणी हायमास्ट उभारणे (२०.९१ लाख ),
नॅशनल हायवे बुलेट शोरूम ते डॉ. रुपनवर यांचे हॉस्पिटल पर्यंत रस्ता व अंडरग्राउंड करणे ( ३४.५५ लाख ), मंडईमध्ये अंतर्गत रस्ते करणे ( ६८.७३ लाख ), रत्नप्रभात हाउसिंग सोसायटीमध्ये ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईन व रस्ते करणे ( ४५.३६ लाख ), प्रभाग क्रमांक एक मध्ये भैरोबा नगर येथे अंतर्गत रस्ते व ड्रेनेज करणे ( १२८.२१ लाख ).
आपण सत्तेवर असताना इंदापूर शहरामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने विकास कामे केल्याने आज शहराचा सर्वांगीण विकास दिसत आहे. आगामी काळातील शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी नमूद केले.