पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले आहे. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज शुक्रवारी (ता. ३०)पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा १८ जून रोजी १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.