Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुस खिंड येथील अनोळखी मृतदेहाच्या खुनाचा छडा लावला अवघ्या ६ तासात ; गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ च्या पोलिसांची कामगिरी ; साडूसह दोघांना अटक…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 29 December 2022, 21:05

पुणे : सुसखिंड येथील अनोळखी मृतदेहाच्या खुनाचा छडा अवघ्या सहा तासात लावण्यास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ च्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी साडूसह दोघांना आरोपीना अटक केली आहे.

संदिप शंकर शिंपी असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर सतीश रामभाऊ गिऱ्हे, रा. सचिन पाडळे चाळ, शितलादेवी मंदिराजवळ, म्हाळुंगे, पुणे २) दिपक विठ्ठल कोळेकर, रा. पॅनकार्ड क्लब रोड, चाकणकर चाळ, बाणेर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुस खिंड येथे निर्जन स्थळी एका अनोळखी इसमाचा अज्ञात आरोपींनी डोक्यात दगड घालुन खुन केल्याची माहिती पोलिसांना गुरुवारी (ता.२९) पहाटे प्राप्त पोलिसांना झाली. सदर खुनाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणुन आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.

 

सदर सुचनाच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी युनिट ४ कडील तपास पथक तयार करून मयताची ओळख पटवुन, आरोपींना निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन व सुचना देऊन तपास पथक रवाना केले.

मयताचे डोक्यात दगड घातल्याने त्याचा चेहरा ओळखीस येत नव्हता. तसेच त्याची ओळख पटविण्यासाठी कोणतीही योग्य कागदपत्रे अथवा इतर ठोस माहिती उपलब्ध नव्हती. तरीदेखील युनिट ४ कडील अधिकारी व अंमलदार यांनी बाणेर परिसरात मयताची माहिती घेण्याकरीता परिसर पिंजून काढला.

दरम्यान,पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील व पोलीस अंमलदार अजय गायकवाड हे मयताची माहिती घेत असताना त्यांना एका इसमाकडुन मयताची अचुक माहिती मिळाली. सदर मयताचे नाव संदिप शंकर शिंपी असे समजले, त्यांनतर तपास पथकातील इतर अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय व सखोल चौकशीद्वारे संदिप शिंपी यांना बुधवारी (ता.२८) दोन इसमांनी बुलेट मोटार सायकलवर बसवुन नेताना पाहिल्याची माहिती मिळवली.

सदर माहितीच्या आधारे म्हाळुंगे येथुन दोन संशयित इसमांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आरोपींनी संदिप शिंपी याचा डोक्यात दगड घालुन खुन केल्याची कबुली पोलिसांना दिली. संदिप शिंपी हा त्याच्या बायकोला दारु पिऊन सतत मारहाण, शिवीगाळ करीत असे. तसेच त्याच्या बायकोचा भाऊ (मेहुणा) आरोपी सतीश गिऱ्हे यांना व त्याच्या घरच्यांना दारुच्या नशेत शिवीगाळ दमदाटी करीत असे. या कारणामुळे वैतागुन संदिप शिंपी याला निर्जन स्थळी नेऊन खुन केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपी दिपक कोळकर हा आरोपी सतीश गिऱ्हे याचा साडु भाऊ असल्याचे चौकशीत समजले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगीरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त अमोल झेडे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश, माने सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंगलदार अजय गायकवाड, हरिष मोरे, सारस साळवी यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक ; आई हिराबेन मोदी यांचे निधन..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.