अजित जगताप
सातारा :मध्य प्रदेशातील सरकारने ओ बी सी आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेची माहिती घेऊनच बाजू मांडली. त्यामुळे ओ बी सी समाज्याला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण दिले आहे.काँग्रेसची इच्छा नव्हती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आरक्षण बाबत मोठा विषय आहे अशी खोचक टीका भाजपचे माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी सातारा येथे केली.
ओ बी सी आरक्षणाबाबत सातारा येथील शासकीय विश्रामगृहात सायंकाळी पत्रकार परिषद घेतली होती.
त्यावेळी त्यांनी विकास कामे करण्यासाठी आमदार झालो असून मंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतली असे स्पष्ट करून आ गोरे यांनी सांगितले की, ओ बी सी आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर प्रयत्न केले. अडीच वर्षात त्यांचे ऐकले असते तर विलंब झाला नसता. सध्या काही पक्ष श्रेय घेत असले तरी अडीच वर्षे आरक्षण का मिळाले नाही?मागील सरकारने गंभीरपणे विचार केला नाही. मराठा नेते मुख्यमंत्री असताना प्रश्न सुटले नाहीत. मराठा, ओ बी सी, एस सी यांना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
आमदार गोरे पुढे म्हणाले, एस टी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करा असे नेते कधी ही म्हणाले नव्हते. वेतन वाढ देऊन त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन झाले होते.तत्कालीन राज्य सरकारने जबाबदारी पार पाडली असती तर एस टी कर्मचाऱ्यांचे जीव गेले नसते.
म्हसवड एम आय डी सी बाबत आ गोरे म्हणाले, कोरेगावला एम आय डी सी स्थलांतरित झाली पाहिजे अशी चर्चा होत होती पण, त्याठिकाणी जमीन उपलब्ध झाली नाही. म्हसवड येथे पाच हजार एकर जमीन उपलब्ध आहे. केंद्र सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा आराखडा मांडला आहे. या एम आय डी सी बाबत जमिनीचे व्यवहार करणारे दलाल काळजीत पडले आहेत. असा ही आरोप केला.
म्हसवड एम आय डी सी, जिहे-कठापुर योजनेची दुष्काळी भागात पाणी मिळावे, टेंभू व कले ढोण योजनेची पाणी ३२गावांना मिळवून देण्यासाठी यश आले आहे.अतिरिक्त पाणी देण्याचाही निर्णय झाला असून पुढील पंचवीस दिवसात माण; खटाव तालुक्यात पाणी येईल. सर्व प्रश्न सुटले की, मंत्री झाल्यासारखेच वाटेल असे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले.
दरम्यान मुंबई येथे १००कोटी रुपयांची मंत्री पदासाठी मला नव्हे तर राहुल कुल यांना मागणी केली होती. मला फोन आला होता. पण, त्याची माहिती घेतली असता त्याच्या चारचाकी वाहनाचा नंबर हा दोन चाकी वाहनाचा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारले असता यांना मंत्री करायला आलो आहे. असे बलिशपणे उत्तर दिले. एवढी मोठी रक्कम आमदार पोत्यातुन घेऊन येतो का?रक्कम मोठी सांगितल्याने कोणीही गळाला लागले नाही. असे ही शेवटी त्यांनी सांगितले…