Wedding Funding : नवी दिल्ली : देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशातच लग्न करणाऱ्या किंवा लग्न करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांबाबत एक सर्वेक्षण समोर आल आहे. स्व:ताच्या लग्नाविषयी सर्वजण खूप उत्सूक असतात.
पालक आपल्या मुलांचे लग्नाससाठी अगदी सुरुवातीपासूनच बचत करू लागतात. पण सध्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की आजकालचे तरुण किंवा तरुणी आपल्या लग्नाच्या खर्चासाठी पालकांवर अवलंबून राहू इच्छित नाहीत. 42 टक्के तरुणांना त्यांच्या लग्नाचा खर्च स्वतः उचलायचा आहे. यामध्ये मुली आघाडीवर आहेत. सर्वेक्षणानुसार 60 टक्के मुलींना त्यांच्या लग्नाचा खर्च स्वतः करावासा वाटतो.
इंडियालँड्स या संस्थेना हा अहवाल समोर आणला आहे. इंडियालँड्सला त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, आजच्या तरुणांना त्यांच्या लग्नाचा आर्थिक खर्च स्वतः करायचा आहे. असा विचार करणाऱ्यांमध्ये मुली आघाडीवर आहेत.
60 टक्के मुलींना वाटतं स्वतः खर्च करावा
सर्वेक्षण करण्यात आलेल्या तरुणांपैकी 58.8 टक्के लोकांना अतिशय भव्य आणि जिव्हाळ्याचा विवाह करायचा आहे. 60 टक्के मुलींना त्यांच्या लग्नाचा खर्च स्वतः करावासा वाटतो, तर पुरुषांची संख्या 52 टक्के आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, आजची तरुणाई थाटामाटात पारंपारिक आणि साध्या लग्नाला अधिक प्राधान्य देत आहे.
कसं करणार लग्न?
42.1 टक्के तरूणांचा ओघ साध्या लग्नाकडे आहे. तर 26.3 टक्के वधू-वरांनी कर्ज घेऊन लग्न करणार असे सांगितले. ज्या लोकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला, त्यापैकी 70 टक्के लोकांकडे लग्नाच्या खर्चासाठी 1 ते 10 लाख रुपयांचे बजेट आहे. 21.6 टक्के तरुणांचे बजेट 11.25 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर 8.4 टक्के तरुण असे आहेत ज्यांचे बजेट 25 लाखांपेक्षा जास्त आहे. इंडियालेंड्सचे संस्थापक आणि सीईओ गौरव चोप्रा म्हणाले की, आजच्या तरुणांच्या विचारांमध्ये आपण मोठा बदल पाहत आहोत. तुमच्या लग्नाला स्वतः निधी देणे हे आर्थिक स्वातंत्र्य आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याकडे निर्देश करते.