Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral News: कुत्र्याने चाटलं अन् 6 वेळा आला हार्ट अटॅक, हात-पायही गमावले; महिलेसोबत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 24 February 2026, 15:35

Viral News: लंडन: आपल्या पाळीव प्राण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांसाठी एक अत्यंत हादरवणारी घटना समोर आली आहे. ब्रिटनमध्ये एका 52 वर्षीय महिलेला आपल्या लाडक्या कुत्र्याने प्रेमाने चाटणे इतके महागात पडले की, तिला आपले दोन्ही हात आणि दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. इतकेच नाही तर मृत्यूशी झुंज देत असताना तिला तब्बल 6 वेळा हृदयविकाराचा झटका आला.

 

नेमकं काय घडलं?

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मंजीत संघा या जुलै 2025 मध्ये नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतल्या. घरी आल्यावर त्यांना थोडी अस्वस्थता जाणवू लागली. सुरुवातीला कामाचा ताण आणि थकवा असावा, असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, रात्री त्यांची प्रकृती वेगाने खालावली.

त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना सेप्सिस नावाचा गंभीर संसर्ग झाल्याचे सांगितले. उपचार सुरू असताना त्यांना 6 वेळा हृदयविकाराचे झटके आले. संसर्ग संपूर्ण शरीरात पसरल्यामुळे डॉक्टरांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागला. अखेरीस त्यांचे दोन्ही हात आणि गुडघ्याखालचे दोन्ही पाय कापावे लागले.

कुत्र्याच्या चाटण्यामुळे पसरले इन्फेक्शन

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शरीरावर एक छोटी जखम होती. त्यांच्या पाळीव कुत्र्याने त्या जखमेवर चाटले होते. कुत्र्यांच्या लाळेमध्ये कॅपनोसायटोफेगा कॅनिमोरसस नावाचा बॅक्टेरिया असू शकतो. हा बॅक्टेरिया जखमेद्वारे शरीरात गेल्यास सेप्सिससारखा गंभीर संसर्ग होऊ शकतो. या संसर्गामुळे शरीरातील अवयव निकामी होण्याचा धोका असतो.

या घटनेमुळे डॉक्टरांनी पाळीव प्राणी असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. शरीरावर जखम असल्यास ती स्वच्छ ठेवावी आणि प्राण्यांना त्या भागाला चाटू देऊ नये. तसेच अचानक ताप, अशक्तपणा किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. योग्य काळजी घेतल्यास असे धोके टाळता येऊ शकतात.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune

Pune : खेळता खेळता दगडाचा तुकडा गिळला अन् श्वास कोंडला; पुण्याच्या ससून रुग्णालयात चिमुकल्याची जीवघेण्या संकटातून सुटका

Saturday, 4 April 2026, 13:11
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Crime

Crime : 21 लाखांचे कर्ज, ट्रक चोरी अन् बँकेचे हप्ते; 26 वर्षीय तरुणाची ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या

Saturday, 4 April 2026, 12:18
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Next Post

Causes of Cramps: 'या' पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे येतो 'वात', वाचा सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.