नवी दिल्ली: महात्मा गांधी हे महापुरूष होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरूष आहेत, असं वक्तव्य देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी केलं आहे. जैन विचारवंत आणि तत्त्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. उपराष्ट्रपतींच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे.
जैन विचारवंत आणि तत्त्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंती सोहळ्यात बोलताना धनखड म्हणाले, महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला ज्या मार्गावर जायचे होते त्या मार्गावर नेले. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. महात्मा गांधी हे गेल्या शतकातील महान पुरुष होते. नरेंद्र मोदी हे या शतकातील विद्वान पुरुष आहेत.
काय म्हणाले जगदीप धनखड?
धनखड म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी या दोन महान व्यक्तींमध्ये एक गोष्ट समान आहे. त्यांनी श्रीमद् राजचंद्रजींना प्रतिबिंबित केले आहे. ते म्हणाले, ”या देशाच्या विकासाला विरोध करणाऱ्या शक्ती आणि या देशाचा उदय पचवू न शकणाऱ्या शक्ती एकत्र येत आहेत. जेव्हा जेव्हा देशात काही चांगले घडते तेव्हा हे लोक वेगळ्या मूडमध्ये येतात. असे होऊ नये.”
दरम्यान, महात्मा गांधी आणि मोदींबद्दल धनखड यांच्या टिप्पणीवर, बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आश्चर्य व्यक्त केले. एका विशिष्ट समुदायावर अत्याचार करण्याचे स्वातंत्र्य देऊन कोणते नवीन युग सुरू झाले आहे? असं त्यांनी म्हटलं आहे.
आज @VPIndia ने कहा कि पिछली शताब्दी के महापुरुष महात्मा गांधी थे, इस शताब्दी के युगपुरुष नरेंद्र मोदी हैं! मैं उपराष्ट्रपति जी से पूछना चाहूँगा की संसद में प्रधानमंत्री के ही दल के सांसद द्वारा एक समुदाय विशेष को अपशब्द इस्तेमाल करने की छूट दे कर किस नये युग की शुरुआत की गई है। https://t.co/wzKcgsHaTt
— Kunwar Danish Ali (@KDanishAli) November 27, 2023