breaking News- दिल्ली : लाचेचा गुन्हाही आता मनी लॉंड्रिंगच्या अंतर्गत गुन्हा मानला जाणार आहे. (breaking News) असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला आहे. (breaking News) या निर्णयाने ईडीची धार आणखी वाढणार आहे. (‘The crime of bribery will now also be considered under money laundering..’- Supreme Court’s decision)
तमिळनाडूतील भ्रष्टाचाराशी संबंधित एका प्रकरणात न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. व्ही. सुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. द्रवीड मुन्नेत्र कळघम अर्थात द्रमुकचे आमदार आणि तमिळनाडूचे एक मंत्री सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित एका प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. (bribery will now considered as a money laundering) त्यादरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.लाचखोरीच्या प्रकरणातही ईडी पीएमएलए कायद्या अंतर्गत कारवाई करू शकणार आहे. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 च्या कलम 7 नुसार कारवाई केली जात होती.
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या कारवाईचे अगोदरच देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (bribery will now considered as a money laundering) त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ईडीची ताकद आणखीनच वाढणार आहे.