सुरत : देशभरात गणेशोत्सव मोठा जोमाने सुरू आहे. सुरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. सुरतमध्ये सय्यदपुरा परिसरात समाजकंटकांकडून गणपती मंडपावर दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण सय्यदपुरा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपाींना अटक केली असून 27 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर स्थानिक हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरून प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्याचसोबत शेकडो लोकांनी सय्यदपुरा पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येऊन निदर्शने देखील केली. या घटनेनंतर तणाव पाहून स्थानिक आमदारही घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
दगडफेकीनंतर सूरतमधील लोक उग्र झाले होते.त्यांना शांत करण्याचा पोलीसांनी प्रयत्न केला. गर्दी हाताबाहेर जात आहे असे दिसल्यानंतर पोलीसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.