America Accident : अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या भीषण दोन मुलांसह अपघातात भारतीय वंशाच्या कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात मिनीव्हॅन आणि पिकअप ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने घडला आहे. या धडकेत कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
मिनीव्हॅनमध्ये प्रवास करणारे लोक हे अल्फारेटा, जाॅर्जिया येथील रहिवासी असून आंध्रप्रदेशातील अमलापुरम शहरातील एका कुटुंबातील सात जण प्रवास करत होते. हे कुटुंब मूळ आंध्रप्रदेशातील असून, मुम्मीदीवरमचे आमदार पी. वेंकट सतीश कुमार यांचे नातेवाईक आहेत. व्हॅनमधून अपघातात केवळ लोकेश पोटाबाथुला नावाची व्यक्ती बचावली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये नवीना पोटाबथुला, 36, नागेश्वर राव पोनडा, (64), सीतामहालक्ष्मी पोनाडा (60), क्रुतिक पोटाबथुला (10), निशिधा पोटाबथुला(9) यांचा समावेश आहे. डीपीएसने सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या 43 वर्षीय लोकेश पोटाबथुला याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकचा चालक आणि इतर प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वृद्ध दाम्पत्य आणि दोन्ही लहान मुलांनी सीटबेल्ट घातले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.. अपघातात मृत झालेले भारतीय वंशाचे मृतदेह हे भारतात पाठवले जाणार आहेत. मृतदेह भारतात पाठवण्याची तयारी सुरु आहे अशी माहिती तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिकेचे अशोक कोल्ला यांनी दिली.