चेन्नई: चेन्नईच्या अण्णा नगर येथील एका घरातून पती, पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. कुटुंब कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते. त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले असे म्हंटले जात आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या किंवा हत्या झाली याबाबत पोलिस तपास करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा कार चालक आज म्हणजेच गुरुवारी सकाळी घरी पोहोचला. मी दार ठोठावले तेव्हा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली, त्यावेळी हि संपूर्ण घटना समोर आली आहे. दरम्यान, आत्महत्या कधी केली याचा तपास सुरु आहे.

बालमुरुगन आणि यांची पत्नी वकील सुमाथी एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आले, तर त्यांचा मुलगा दुसऱ्या खोलीत मृतावस्थेत आढळला. डॉ. बालमुरुगन यांचा मोठा मुलगा दासवंत हा बारावी होता. तर लहान मुलगा लिंगेश हा दहावीत शिकत होता. डॉ. बालमुरुगन चेन्नईच्या वेगवेगळ्या भागात अनेक अल्ट्रासाऊंड सेंटर चालवत होते. त्याच्यावर खूप कर्ज असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.







