Petrol Diesel Price : नवी दिल्ली : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करू शकते, असे सांगण्यात येत आहे. या संदर्भात ओएमसी आणि सरकारमध्ये बोलणी सुरू असल्याचे मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरात कपातीचे हे वृत्त दिशाभूल करणारे आहे, असे हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले.
भारत 85 टक्के तेल आयात करतो
भारत सध्या तेल स्त्रोतांमध्ये विविधता आणण्यावर भर देत आहे. सध्या, भारत आपल्या तेलाच्या 85 टक्क्यांहून अधिक गरजा भागवण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. पुरी म्हणाले की, भारत व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करेल, भारतीय रिफायनरीज दक्षिण आफ्रिकेतील देशातून जड तेलावर प्रक्रिया करण्यास सक्षम आहेत. ज्यावर कोणतेही निर्बंध नाहीत असे तेल भारत आयात करू शकते. आम्ही अशा परिस्थितीत आहोत की आम्ही दररोज 5 दशलक्ष बॅरल कच्चे तेल वापरत आहोत. ते दररोज वाढत आहे. व्हेनेझुएलाचे तेल बाजारात आले तर आम्ही त्याचे स्वागत करू असे मंत्री पुरी म्हणाले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आलेखानुसार, नोव्हेंबर 2021 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान, भारतात पेट्रोलच्या किमतीत 11.82 टक्के आणि डिझेलच्या किमतीत 8.94 टक्क्यांनी घट झाली आहे.
सरकारची तेल कंपन्यांशी कोणतीही चर्चा नाही
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, सरकारी तेल कंपन्या इंधनाच्या किंमती कमी करण्याबाबत केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा करत नाहीत. सर्व मीडिया रिपोर्ट्स केवळ अनुमानांवर आधारित आहेत. त्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याची माहिती मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. सध्या प्रचंड अशांततेचे वातावरण आहे. जागतील दोन प्रमुख भागांमध्ये संघर्ष सुरु आहे. त्यामुळं कच्च्या तेलाच्या किंमती अस्थिर आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, पुरी म्हणाले की, इंधनाच्या दरात कपातीचे हे वृत्त दिशाभूल करणारे आहे.
लाल समुद्रात तेलवाहू जहाजांच्या टँकरवर यहुथींनी केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती. 26 डिसेंबर रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 81.07 डॉलरवर पोहोचली होती. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 90 डॉलरच्या जवळपास पोहोचेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. 26 डिसेंबरपासून ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत सुमारे 7 टक्क्यांनी घसरण झाली आहे. दुसरीकडे, अमेरिकन कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 70 डॉलरच्या खाली गेली आहे.