Odisha Train accident Update : बालासोर : ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या दुर्घटनेनंतर हजारो रेल्वे प्रवाशांनी त्यांच बूक झालेलं रेल्वेचं तिकीट रद्द केलं आहे. कारण त्यांना वाटतं की, रेल्वेने प्रवास करणं आता सुरक्षित नाही. असा दावा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मात्र रेल्वे विभागाने (IRCTC) हा दावा फेटाळला आहे. (Railway department rejects Congress claim regarding Odisha accident, gives ‘this’ important information)
काय आहे प्रकरण
भक्त चरण दास यांचा व्हिडीओ काँग्रेसने ट्विटरवर शेअर केला होता. हा व्हिडीओ रिट्वीट करून इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) काँग्रेसला उत्तर दिलं आहे. (Odisha Train accident Update) यात आयआरसीटीसीने म्हटलं आहे की, खरंतर हा दावा चुकीचा आहे. तिकीट रद्द करण्याचं प्रमाण वाढलेलं नाही. उलट तिकीट रद्द करण्याचं प्रमाण घटलं आहे. ०१ जून रोजी ७.७ लाख तिकीटं रद्द करण्यात आली होती. तर ०३ जून रोजी ७.५ लाख तिकीटं रद्द करण्यात आली.
काय म्हणाले होते भक्त चरण दास
अलिकडच्या काळात अशी रेल्वे दुर्घटना कधीच झाली नाही. या दुर्घटनेत शेकडो लोकांनी जीव गमावला. तर एक हजारहून अधिक लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. (Odisha Train accident Update ) या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. भक्त चरण दास यांनी दावा केला आहे की, दुर्घटनेनंतर हजारो रेल्वे प्रवाशांनी त्यांच बूक झालेलं रेल्वेचं तिकीट रद्द केलं आहे. कारण त्यांना वाटतं की, रेल्वेने प्रवास करणं आता सुरक्षित नाही.