नवी दिल्ली : महानगरांसह इतर शहरांमध्ये तेल कंपन्यांनी गुरुवारी (ता. २८) पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती अपडेट केल्या आहेत. आज गाडीत इंधन भरण्यापूर्वी आजचे रेट अवश्य जाणून घ्या. महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत १०४.८९ रुपये प्रति लिटर आहे. तर गेल्या महिन्याच्या अखेरीस पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये प्रति लिटर होती. पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०४.३० रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९०.८२ रुपये प्रति लिटर आहेत. महाराष्ट्रात मागील महिन्याच्या तुलनेत इंधनाच्या किंमती आता ०.०६ टक्के कमी झाल्या आहेत.
महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांमध्ये पेट्रोलची सरासरी किंमत १०४.८९ रुपये प्रति लिटर राहिली. तर राज्यात डिझेलची सरासरी किंमत आज ९१.५३ रुपये प्रति लिटर आहे. गेल्या महिन्याच्या अखेरच्या तारखेला डिझेलची सरासरी किंमत ९१.५४ रुपये प्रति लिटर होती. राज्यातील इतर शहरांतील किंमती जाणून घेऊया.
- – मुंबईमध्ये पेट्रोलच्या किंमती १०४.२१ रुपये प्रति लिटर तर डिझेलच्या किंमती ९२.१५ रुपये प्रति लिटर आहेत.
- – नाशिकमध्ये पेट्रोल १०४.४८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९१.०० रुपये प्रति लिटरने विक्री होतंय.
- – नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९८ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.५४ रुपये प्रति लिटर अशी आहे.
- – छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०५.१६ रुपये तर डिझेल ९१.६५ रुपये प्रति लिटर आहे.
- – अहमदनगरमध्ये पेट्रोलचा दर १०४.३७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा भाव ९०.८९ रुपये प्रति लिटर असा आहे.
- – अमरावतीमध्ये पेट्रोलचा दर १०४.७२ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा भाव हा ९१.२६ रुपये प्रति लिटर असा आहे.
- – सोलापुरात पेट्रोलचा भाव १०४.९५ रुपये आहे. तर डिझेलचा दर ९१.४७ रुपये प्रति लिटर असा आहे.
- – कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा भाव १०३.९७ रुपये आणि डिझेलचा भाव ९०.५४ रुपये प्रति लिटर असा आहे.