नवी दिल्ली: संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार मानला जाणारा आरोपी ललित झा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली आहे. ललित हा या संपूर्ण कटाचा सूत्रधार असल्याचं बोललं जात आहे. तो संसद भवनाबाहेर घोषणाबाजी करतानाचा व्हिडिओ बनवत होता. नंतर त्याने हा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचे मोबाईल ललितकडे होते. तो मूळचा कोलकाता येथील आहे.