दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात एका वेगळ्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. ७३ वर्षे जुन्या कारमुळे ग्वालियरमधील शाही परिवारावारातील मुलीचे लग्न मोडले आहे. हे प्रकरण ११५१च्या खास रोल्स रॉयस कारचे आहे. ही कार वडोदराच्या महाराणीसाठी एचजे मुलिनर अॅण्ड कंपनीने बनवली होती. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराणीसाठी या कारची ऑर्डर दिली होती. आता या कारमुळे मुलीचे लग्न तुटले आहे. तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहचले आहे.
मुलाच्या कुटुंबाने मुलीच्या परिवारावर लग्नात रक्कमेत हेराफेरी केल्याचा दावा केला आहे. त्यासंदर्भात पोलिसात तक्रारही दिली आहे. त्यानंतर मुलीच्या परिवाराने मुलावर हुंडा मागितल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. या प्रकरणात घटस्फोटाचा दावा ऋषिकेश आणि ग्वालियरमध्ये दाखल करण्यात आला होता. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठासमोर प्रकरण सुनावणीसाठी आले. त्यावेळी वरिष्ठ वकील विभा दत्ता मखीजा यांनी सांगितले की, महिला कठीण परिस्थितीत अडकली आहे. त्यांच्या शाही परिवारात पुन्हा लग्न करण्याची परंपरा नाही. युक्तीवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकणात न्या. आर बसंत यांना मध्यस्थ म्हणून नियुक्त केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुलगी व तिचे कुटुंब स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज यांचे अॅडमिरल आणि कोकणातील शासक असल्याचा दावा करतात. दुसरीकडे मुलीचे वडील आर्मीमध्ये कर्नल होते. त्यांचा परिवार इंदूरमध्ये एक शैक्षणिक संस्था चालवतो. दोन्ही परिवारात मार्च २९१८ मध्ये ग्वालियर येथे साखरपुडा झाला होता. त्यानंतर अधिकेशमध्ये लग्न झाल्याचा दावा केला जातो. त्यानंतर एका कारमुळे दोन्ही परिवारात वाद झाला.