Kerala Wayanad Landslide : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ मुसळधार पावसामुळे पहाटे भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत 400 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले असून, 19 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास मेप्पडीजवळील डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यामुळे मलप्पुरममधील निलांबूर परिसरातून वाहणा-या चालियार नदीत पूर आला. त्यामुळे वायनाडमधील मेप्पडी पंचायत अंतर्गत मुंडक्काई आणि चुरलमाला गावात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे.
केरळमध्ये झालेल्या या भूस्खलनानंतर हवाई दलाची एमआय-17 आणि एक एएलएचची दोन हेलिकॉप्टर सकाळी साडेसात वाजता सुलूरहून निघाली आहेत. सध्या बचावकार्य सुरु असून, या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर केरळमधील व्यथिरी, कालापट्टा, मेप्पडी आणि मानंतवाडी रुग्णालयांसह सर्व रुग्णालये सज्ज आहेत. सर्व आरोग्य कर्मचारी सेवेसाठी दाखल झाले.
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (केएसडीएमए) याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘बाधित भागात अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पथके तैनात करण्यात आली आहेत. एनडीआरएफची अतिरिक्त टीम वायनाडला जाणार आहे.
Distressed by the landslides in parts of Wayanad. My thoughts are with all those who have lost their loved ones and prayers with those injured.
Rescue ops are currently underway to assist all those affected. Spoke to Kerala CM Shri @pinarayivijayan and also assured all possible…
— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2024
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची माहिती घेत दु:ख व्यक्त केलं. मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून दोन लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती, पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे.