LPG Price : LPG गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील प्रमुख सरकारी तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे सरत्या वर्षाच्या अखेरीस ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या ग्राहकांना प्रत्येक सिलेंडरवर सुमारे 40 ते 40 रुपयांचा नफा मिळणार आहे.
दरम्यान, हा दिलासा सर्वसामान्यांना नसून छोटे दुकानदार आणि हॉटेलमालकांना देण्यात आला आहे. फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातच कपात करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
असे आहेत किमतींमध्ये बदल
व्यावसायिक गॅस सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. साधारणत: गॅस सिलिंडरच्या दरात प्रत्येक महिन्याच्या पहिला तारखेला बदल केला जातो. कधी सिलिंडरचे दर वाढतात तर कधी कमी केले जातात. पण, यावेळी ख्रिसमस सणाच्या आधीच गॅसचे दर कमी करण्यात आले आहेत. गॅस कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात ३९.५० रुपयांनी कपात केल्यानंतर आजपासून दिल्लीत व्यावसायिक गॅसचा सिलिंडर १७५७ रुपयांना मिळणार आहे.
यापूर्वी या सिलिंडरची किंमत १७९६.५० रुपये इतकी होती. कोलकात्यात १९ किलोच्या सिलेंडरची किंमत आता १ हजार ८६८. ५० इतकी झाली आहे आहे. दुसरीकडे मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर आता १ हजार ७१० रुपयांना मिळणार आहे. तर, चेन्नईमध्ये १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १ हजार ९२९ रुपयांना विकले जाणार आहे. दरम्यान, १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली असली, तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९०२.५ रुपये आहे. तर दिल्लीत घरगुती सिलिंडर ९०३ रुपये, पश्चिम बंगाल ९२९ रुपये, तर चेन्नईत घरगुती गॅस सिलिंडर ९१८.५ रुपयांना विकला जात आहे