नवी दिल्ली: लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. सरकार स्थापनेबरोबरच मंत्र्यांनाही मंत्रिपद सोपवण्यात आले आहे. आता 18व्या लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रश्नाचे उत्तर 26 जूनला मिळणार आहे. वास्तविक, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक २६ जून रोजी होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
Election of Lok Sabha Speaker to be held on 26th June 2024
— ANI (@ANI) June 13, 2024
लोकसभेचे अध्यक्ष कोण होणार?
राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकलेल्या ओम बिर्ला यांच्याकडे पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षपदाची कमान सोपवली जाऊ शकते, असे वृत्त आहे. याशिवाय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीची बहिण डी. पुरुंडेश्वरी यांच्या नावाचीही चर्चा आहे.