लखनऊ: लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. डिंपल यादव यांना मैनपुरीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने आंबेडकर नगर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री लालजी वर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी बसपा सोडली आणि सपामध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना कटहारी विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. निवडणूक जिंकून ते आमदारही झाले. आमदार असतानाच आता सपाने त्यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे. बसपा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले लालजी तांडा मतदारसंघातून आमदारही राहिले आहेत.
उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे-
संभल – शफिकुर्ररहमान बर्क
फिरोजबाद – अक्षय यादव
मैनपुरी – डिंपल यादव
एटा- देवेश शाक्य
बंदायू- धर्मेंद्र यादव,
खीरी – उत्कर्ष वर्मा
धौरहरा -आनंद भदौरिया
उन्नाव – अन्नु टंडन
लखनऊ- रविदास मेहरोत्रा
फर्रुखाबाद – डॉ. नवल किशोर शाक्य
अकबरपुर- राजाराम पाल
बांदा- शिवशंकर सिंह पटेल
फैजाबाद – अवधेश प्रसाद
अंबेडकरनगर- लालजी वर्मा
बस्ती- राम प्रसाद चौधरी
गोरखपुर – काजल निषाद