अलिगड (उत्तर प्रदेश): 31 जुलैचा दिवस होता… वेळ संध्याकाळी 6 ची होती… उत्तर प्रदेशातील अलिगडमधील महुआखेडा भागातील दाऊद खान रेल्वे स्थानकाजवळ दोन मैत्रिणींनी राजधानी एक्स्प्रेससमोर उभे राहत आत्महत्या केली. दोघींचे मृतदेह रेल्वे रुळावर अनेक तुकड्यांमध्ये विखुरले होते. जीव देणारी खुशबू एलएलबी, तर तनु बीएस्सी करत होती. दोघीही एकमेकींचा हात धरून रेल्वे रुळावर उभे राहिल्या. ट्रेन चालक हॉर्न वाजवत राहिला, पण त्या रुळावरून हटल्या नाहीत. रेल्वेची धडक बसल्याने दोघींचा मृत्यू झाला. त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार, खुशबू आणि तनु रतन प्रेम डीएवी इंटर कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. तिथे दोघींची मैत्री झाली. दिवसभर एकत्र फिरणे आणि खाणे असा त्यांचा दिनक्रम असायचा. दोघींची परिस्थिती अशी होती की, त्या एकमेकींशिवाय राहू शकत नव्हत्या. खुशबू मुलासारखी राहत होती. तनु तिच्या प्रेमात पडली. मग एके दिवशी दोघींनी एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले आणि त्यांचे अफेअर सुरू झाले.
पण ग्रॅज्युएट होण्यासाठी दोघीही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये गेल्या. त्यानंतरही त्या रोज बोलत असे. तसेच एकमेकींना भेटतही होते. दोघीही खाटू श्याम दर्शनासाठी आणि मंगलायतनला भेट देण्यासाठी एकत्र गेल्या होत्या. खुशबू आणि तनुने इंस्टाग्रामवर दोन स्वतंत्र अकाउंटही तयार केले होते. एकाचे नाव होते आयुषतानु-जान. दुसरे होते आयुष प्रेमी. या दोन्ही अकाऊंटवर त्यांनी एकमेकींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. ज्यावरून त्यांचे अपार प्रेम असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
यादरम्यान खुशबूच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाचे भनक लागल्याचे मैत्रिणीने पोलिसांना सांगितले. कारण अनेकदा तनू तिच्या घरी येऊन राहायची. खुशबूच्या भावाला सर्वप्रथम त्यांच्या नात्याबद्दल शंका होती. भावाने दोघींना समजावले. पण, त्यांना ते मान्य नव्हते. घरात यावरून बराच गदारोळ झाला. तनुच्या घरच्यांना या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हती. खुशबूच्या घरच्यांनी पुन्हा तिच्यावर बंधने घालायला सुरुवात केली.
खुशबूचा कॉलेज सोडण्याचा निर्णय
दोघीही फोनवर बोलताना खूप रडायच्या. हे थांबवणं खूप गरजेचं असल्याचं कुटुंबीयांना वाटल्यावर त्यांनी खुशबूला शिक्षण घेण्यापासून थांबवण्याचा निर्णय घेतला. मैत्रिणीने सांगितले की, मग खुशबूने मला 30 जुलैला फोन केला. तिने मला तिच्या घरी यायला सांगितले. नंतर आपण काहीतरी खाण्यापिण्याच्या बहाण्याने बाहेर जाऊ. नाहीतर माझे कुटुंबीय मला कुठेही जाऊ देत नाहीत. 31 जुलै रोजी मैत्रीण खुशबूच्या घरी गेली. त्यांना तनूही बाहेर भेटली. तिघेही डॉमिनोजमध्ये गेले. तिथे पिझ्झा खाल्ला. त्यानंतर तेथून खुशबू एसव्ही कॉलेजमध्ये गेली.
‘खरंच आत्महत्या केली’
मैत्रिणीने सांगितले की, त्यावेळी दोघींनी ते एकमेकींशिवाय राहू शकत नाहीत. जर एक होऊ शकत नसतील, तर त्या आत्महत्या करतील, असे म्हटले होते. मला वाटलं कदाचित दोघीही मस्करी करत असतील. यानंतर मी तेथून निघून गेली. तेव्हा मला कळले की, त्यांनी खरच आत्महत्या केली, असं मैत्रिणीने म्हटलं आहे.