Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले निलंबित; १ लाखांची केली होती मागणी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 3 August 2024, 16:02

लोणीकंद, (पुणे) : तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले होते. या सहायक निरीक्षकाला शहर पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय-३६) असे निलंबित करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन थोरबेले हे लोणीकंद पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. एका ३२ वर्षीय व्यक्तीविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला होतं. या तक्रार अर्जाचा तपास थोरबोले यांच्याकडे देण्यात आला होता. या तपासात त्यांच्या बाजूने अहवाल देण्यासाठी आणि भविष्यात त्रास न देण्यासाठी सहाय्यक निरीक्षक चेतन थोरबोले यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले होते.

दरम्यान, तक्रारदाराने अगोदरच या तक्रार अर्जामुळे नोकरी गेली असताना आणखी ५ लाख रुपयांची लाच मागत असल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची १, ४, ११ आणि २४ जुलै रोजी पडताळणी केली. यामध्ये चेतन थोरबोले यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाची पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी गंभीर दखल घेत त्यांनी थोरबोले यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. थोरबोले यांचे वर्तन बेजबाबदार, बेफिकीर, नैतिक अध:पतन आणि गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे.

 

थोरबोले यांना मुंबई पोलीस (शिक्षा व अपिले) नियम १९५६ मधील नियम ३ (१-अ) (एक) (ब) च्या तरतुदीनुसार व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील २५ अन्वये तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (निलंबन, बडतर्फी व सेवेमधून काढून टाकणे यांचे काळातील प्रदाने) नियम १९७९ मधील नियमांनुसार कारवाई करत शासकीय सेवेमधून निलंबित करण्यात येत आहे, असंही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच थोरबोले यांना निलंबन कालावधीत दररोज नियंत्रण कक्षामध्ये हजेरी देण्याबाबतदेखील आदेशात म्हटले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36

भोरमधील धक्कादायक प्रकार! चुलत भावांनीच तोडले शरीराचे लचके; अल्पवयीन मुलीला माळरानावर नेत अत्याचार, मुलगी गर्भवती राहताच…

Thursday, 22 October 2026, 22:31

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41
Next Post

पुणे पोर्श अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाबरोबर त्याच्या मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp