नवी दिल्ली : सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना भारताचे 51 सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. 11 नोव्हेंबर रोजी त्यांचा शपथविधी होणार आहे. याबाबत केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काल (दि.24) संध्याकाळी एक्सवर ही घोषणा केली.
“भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करताना, माननीय राष्ट्रपतींनी माननीय सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करताना आनंद होत आहे. 11 नोव्हेंबर, 2024 पासून लागू होईल,” असं त्यांनी पोस्ट केली आहे.
In exercise of the power conferred by the Constitution of India, Hon’ble President, after consultation with Hon’ble Chief Justice of India, is pleased to appoint Shri Justice Sanjiv Khanna, Judge of the Supreme Court of India as Chief Justice of India with effect from 11th…
— Arjun Ram Meghwal (@arjunrammeghwal) October 24, 2024
न्यायमूर्ती खन्ना यांची 2019 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. ते 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा भाग म्हणून न्यायमूर्ती खन्ना यांनी अनेक महत्त्वाचे निकाल दिले आहेत. राजकीय पक्षांना बेनामी देणग्या देणाऱ्या इलेक्टोरल बाँड्स योजनेला रद्द करणाऱ्या घटनापीठात त्यांचा सहभाग होता.