Coronavirus Update:मुंबई: भारतात काल रविवारी कोरोनाचे 656 नवीन रुग्ण आढळले. तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक 128 नवीन कोरोनाबाधित आढळलेत, कर्नाटकात 96 रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी गेल्या 24 तासांची आहे. त्यामुळे देशात सध्या एकूण 3,742 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. डब्ल्यूएचओकडून JN.1 बद्दल धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जगभरात कोरोना रुग्णांमध्ये 52 टक्के वाढ झाली आहे.
भारताव्यतिरिक्त सिंगापूर आणि इंग्लंडसारख्या देशांमध्येही हा नवीन प्रकार आढळून आला आहे. यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 52 टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी ही माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, 20 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान कोरोनाच्या एकूण 8,50,000 हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरात गेल्या 28 दिवसांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये 8 टक्क्यांची घट झाली आहे, यामध्ये 3,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहेत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि गोव्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. 30 नोव्हेंबरपासून ठाणे शहरात 20 रुग्णांचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी जेएन.1 प्रकाराचे 5 रुग्ण आढळले आहेत. ठाण्यात सध्या कोरोनाचे 27 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. JN.1