S. Somnath Autobiography : नवी दिल्ली : इस्रोची चांद्रयान २ची मोहीम यशस्वी रित्या फत्ते झाली. मात्र आता इस्रोच्या आतील खळबळजनक घडामोडी बाहेर येत आहेत. इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. संस्थेचे माजी प्रमुख के. सिवन यांच्यावर मोठे आरोप केले आगे. सिवन यांनी मी इस्रो प्रमुख होऊ नये यासाठी अडथळे आणले होते. मी इस्रोचा प्रमुख होऊ नये अशी सिवन यांची इच्छा होती, असा दावा सोमनाथ यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून केला आहे. ‘निलावु कुडिचा सिम्हंल’ पुस्तकातून त्यांनी असं नमूद केलं आहे.
आव्हानं, अडथळे पार करावी लागली
‘कोणत्याही संस्थेतील सर्वोच्च पदावर जाताना अनेक आव्हानं, अडथळे पार करावी लागतात. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तशाच समस्या माझ्या आयुष्यात आल्या. आयुष्यातील आव्हानांबद्दल लिहिलं असताना कोणावरही वैयिक्तिक टीका केली नसल्याच असं स्पष्टीकरण सोमनाथ यांनी याआधी अनेक मुलाखतीत दिलं. चांद्रयान -२ मोहीम का अपयशी ठरली याची कारण त्यांनी पुस्तकात केली आहे. ‘घाईगडबडीमुळे चांद्रयान -२ मिशन अपयशी ठरलं. या मोहिमेसाठी जितक्या चाचण्या गरजेच्या होत्या, तितक्या करण्यात आल्या नाहीत,’ असा उल्लेख सोमनाथ यांनी पुस्तकात केला आहे.
चांद्रयान-२ मोहिमेचे अपयश
त्यांच्या नियुक्तीच्या विषयानंतर त्यांनी चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशामागील कारणांवर आत्मचरित्रातून प्रकाश टाकला आहे. ‘चांद्रयान- २ मोहीम अपयशी ठरल्याची घोषणा करताना त्या मोहमेदरम्यान झालेल्या चुका लपवण्यात आल्या. ज्या गोष्टी घडल्या, त्या जशाच्या तशा सांगायल्या हव्यात. त्यामुळे सत्य लोकांसमोर येतं. संस्थेत पारदर्शकता राहते. याच कारणांमुळे मी पुस्तकात चांद्रयान-२ च्या अपयशाचा उल्लेख केला आहे,’ असं सोमनाथ म्हणाले.