तेहरान: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आज सहाव्या दिवशी (Israel Iran war) एका अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचला आहे. अमेरिकन युद्धनौकेने केलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे 87 सैनिक ठार इराण आणखी पेटून उठला आहे. या हल्ल्याने संतप्त झालेल्या इराणने आता थेट इस्रायलच्या अणुकेंद्रांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.

हे युद्ध लवकर थांबणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. ट्रम्प यांच्या मते, इराणला पूर्णपणे गुडघ्यावर आणण्यासाठी पुढील 4 ते 5 आठवडे लष्करी कारवाई सुरू राहील. दरम्यान, इराणने घेतलेल्या भूमिकेमुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे आणि अण्वस्त्र युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे.
इराणने केवळ लष्करी तळांवरच नाही, तर अमेरिकेच्या आर्थिक हितसंबंधांवर आणि मित्रराष्ट्रांच्या इंधन पुरवठा केंद्रांवर हल्ले करण्याची रणनीती आखली आहे, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
अमेरिकन नौदलाने समुद्रात इराणची मोठी नाकेबंदी केली आहे. आतापर्यंत इराणची 20 हून अधिक जहाजे उद्ध्वस्त करण्यात आली असून अमेरिकेने सांगितलं कि, “आम्हाला जमीनवर सैन्य उतरवण्याची गरज नाही; आमची हवाई आणि सागरी ताकदच इराणवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरेशी आहे.” विशेष म्हणजे, अमेरिकन सिनेटमध्ये ट्रम्प यांचे युद्धविषयक अधिकार मर्यादित करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आले असून अमेरिकन हवाई दल आणि नौदल अधिक आक्रमक झाले आहे. या युद्धात गेल्या पाच दिवसांत इराणमध्ये 1097 नागरिकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये 168 मुलांचा समावेश आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात काय होणार ते पाहणे महत्वाचं ठरणार आहे.







