नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) पुन्हा एकदा वाढणार आहे. केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवते. पहिला 1 जानेवारीपासून लागू करण्यात आला आहे, तर दुसरा 1 जुलैपासून लागू होणार आहे. या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% एवढा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आला आहे. आता सरकार महागाई भत्त्यात किती वाढ करणार हे पाहणे महत्वाचे आहे.
वाढत्या महागाईचा विचार करता सरकार चार ते पाच टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता आहे. सरकारने डीएमध्ये 5 टक्के वाढ केल्यास 1 जुलैला कर्मचाऱ्यांचा डीए 55 टक्के होईल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या 50 टक्के महागाई भत्ता (DA) मिळत आहे. तो जानेवारी 2024 पासून लागू आहे. महागाई भत्त्यात वाढ जुलै 2024 पासून लागू होणार आहे. मात्र, तो मंजूर होईपर्यंत ऑगस्ट उलटण्याची शक्यता आहे. मागील वर्षांचे रेकॉर्ड पाहिलं तर सरकार सप्टेंबरपर्यंत डीए वाढवण्याची घोषणा करू शकते. मात्र, जुलैपासूनच त्याची अंमलबजावणी होणार आहे.
1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यास सरकारने मान्यता दिली होती. आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सहा भत्त्यांमध्येही लवकरच वाढ होणार आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने 2 एप्रिल 2024 च्या कार्यालयीन ज्ञापनानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते जारी करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
2016 चे मूल्यांकन आणि शिफारशींचे पालन करून, सातव्या वेतन आयोगाने रेल्वे कर्मचारी, नागरी संरक्षण कर्मचारी आणि संरक्षण कर्मचारी यांच्यासह केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या फायद्यांचे परीक्षण केले. दरम्यान, महागाई भत्ता 50 टक्क्यावर गेल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात तीन टक्क्यांपर्यंतची वाढ होणार आहे.
सध्या शहरानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता दिला जातो. आधी X कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 27%, Y कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 18% आणि झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 9% एवढा HRA दिला जात होता. आता मात्र, यामध्ये १ टक्क्यांपासून ३ टक्क्यांपर्यंत ची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार X, Y आणि Z कॅटेगिरीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि १० टक्के असा लाभ दिला जाणार आहे.