India’s World Record : नवी दिल्ली : रस्ते निर्मितीत भारताने चांगलाच वेग पकडला आहे. जगातील अनेक विकसित देशांना मागे टाकत नवा विश्वविक्रम केला आहे. जे काम अमेरिका, चीन व जपानला जमले नाही, तो कारनामा भारताने केला आहे. भारतात १०० किलोमीटरचा रस्ता १०० तासांत तयार झाला आहे. (India’s world record surpassing America, China..! Nitin Gadkari praised the team for constructing 100 km road in just 100 hours)
गाझियाबाद अलिगड मार्गावर बनवला रस्ता
गाझियाबाद-अलिगढ द्रुतगती मार्गादरम्यान NH ३४ वर १५ मे रोजी सकाळी १० वाजता या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली,जी १९ मे रोजी दुपारी २ वाजता म्हणजे १०० तासांत ११२ किमी महामार्ग बांधूनपूर्ण झाला आहे. (India’s World Record) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून या टीमचे अभिनंदन केले आहे.
देशातील अग्रगण्य कंपनी लार्सन अँड टुब्रो ग्रुपने केवळ १०० तासात हा १०० किलोमीटरचा भव्य रस्ता बनवला आहे. (India’s World Record)
या कामासाठी २००० कर्मचारी २४ तास कामाला लागले होते. १०० तासात १०० किमीचा रस्ता तयार करून लार्सन अँड टुब्रोने जुना विक्रम मोडला आहे. (India’s World Record)
विश्वविक्रमाला गवसणी घालणारा हा रस्ता गाझियाबाद ते बुलंदशहर गाझियाबाद ते बुलंदशहर येथे तयार करण्यात आला आहे. (India’s World Record) लार्सन अँड टर्बोच्या यशाबद्दल बुलंदशहर येथील एका रिसॉर्टमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टीमचे अभिनंदन केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी ; 10 कोटींची खंडणीची केली मागणी…!