नवी दिल्ली: ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाचा पंतप्रधान चेहरा म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जू खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही पाठिंबा दिला आहे.
नवी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयूचे राजीव रंजन सिंग, तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. डीएमकेकडून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, शिवसेनेचे (UBT) उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) कडून मेहबूबा मुफ्ती, अपना दल (K) कडून कृष्णा पटेल, पल्लवी पटेल आणि इतर अनेक नेते सहभागी झाले होते.
किती बैठका झाल्या?
यापूर्वी भारताच्या विरोधी आघाडीच्या तीन बैठका झाल्या आहेत. यातील पहिली बैठक 23 जून रोजी पाटणा, बिहार येथे झाली. दुसरी बैठक 17 आणि 18 जुलै रोजी बेंगळुरू येथे झाली. याशिवाय 31 आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत तिसरी बैठक झाली.